(GDM) गर्भधारणेदरम्यान मधुमेह (Gestational Diabetes) – संपूर्ण माहिती
1. Gestational Diabetes म्हणजे काय?
गर्भधारणेदरम्यान काही महिलांमध्ये रक्तातील साखर वाढते, पण त्यांना पूर्वी मधुमेह नव्हता. याला गर्भधारणेदरम्यान मधुमेह (Gestational Diabetes Mellitus – GDM) म्हणतात.
2.Gestational Diabetes लक्षणं (Symptoms):
> बऱ्याच वेळा याची लक्षणं सौम्य असतात किंवा लक्षातच येत नाहीत, पण काही वेळा:
1.खूप तहान लागणे
2.वारंवार लघवी होणे
3.थकवा जाणवणे
4.धुसफुसलेली दृष्टी
5.वजन जास्त वाढणे
3. Geastational diabetes कारणं (Causes):
गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटा मधून हार्मोन्स तयार होतात जे इन्सुलिनचं काम कमी करतात. त्यामुळे शरीरातील साखर नीट मॅनेज होत नाही.
4. जोखीम असलेल्या महिला (Risk Factors):
वय 25 पेक्षा जास्त
आधीच्या गर्भधारणेत GDM झालं असेल
BMI जास्त (स्थूलता)
कुटुंबात मधुमेहाचा इतिहास
PCOD
5 Geastational Diabetes निदान (Diagnosis):
> OGTT (Oral Glucose Tolerance Test) –
24–28 आठवड्यांदरम्यान ग्लुकोज टेस्ट केली जाते.
6. उपचार व औषधे (Treatment & Medicines):
Lifestyle बदल – आहार व व्यायाम
औषधं
Metformin
Insulin (जर control नसेल तर)
> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोळी घेऊ नये.
7. औषधांचे Drug-Drug Interactions:
Metformin घेणाऱ्यांनी NSAIDs (जसे Ibuprofen) टाळावं
Insulin + Beta-blockers = Hypoglycemia risk वाढतो
डॉक्टरने लिहिलेल्या prescriptions नुसारच औषधे घ्या
8. Drug-Food Interactions:
औषध टाळावे असे अन्न
Metformin खूप ऑयली, लो फाइबर आहार
Insulin साखरयुक्त पदार्थं, processed foods
> साखर, मिठाई, कोल्डड्रिंक्स, बेकरी पदार्थ टाळा.
9. नैसर्गिक उपाय (Natural Remedies):
मेथीचे दाणे (रात्री भिजवून सकाळी खा)
दालचिनी पावडर
जवस (Flaxseed)
व्यायाम: चालणे, योगासने (सल्ल्यानुसार)
10.GDMडाएट चार्ट (Sample Diet Chart):
वेळ आहार
सकाळ मेथी पाणी + 1 bowl ओट्स + अर्धा सफरचंद
मधला नाश्ता 5 बदाम + लिंबूपाणी
दुपार 2 ज्वारी/नाचणी चपाती + भाज्या + डाळ
संध्याकाळ 1 cup ग्रीन टी + मूग / फरसाण टाळा
रात्री 1 चपाती + पालेभाजी + दही
झोपण्यापूर्वी 1 glass low fat दूध (no sugar)
11. घरगुती रेसिपीज (Healthy Recipes):
✅ Gestational Diabetes साठी 3 सहज रेसिपी:
1. ज्वारी-मेथी पराठा
ज्वारी पीठ + मेथी + तिखट-मीठ
तवा वर बेक करून द्या दह्याबरोबर
2. ओट्स उपमा
ओट्स + गाजर + शेंगदाणे + लिंबू
3. लो शुगर स्मूदी:
1 काकडी + 1 टमाटं + थोडं लिंबू + पुदिना
मिक्सर मध्ये घालून गाळून प्या
–
12. जपा तुमच्या बाळासाठी (Pregnancy Tips):
1.वजनावर लक्ष ठेवा
2.दर आठवड्याला साखर चेक करा
3.डॉक्टरांच्या फॉलोअपला मिस करू नका
4.सिजेरियन चं प्रमाण GDM मध्ये जास्त असतं – योग्य काळजी घ्या